हा ब्लॉग जर तुम्ही मोबाईलवर वाचत असाल तर स्क्रीन आडवी केल्यास वाचनास सोयीस्कर ठरेल. |
जर तुमच्याकडे जास्वंदीचे झाड असेल वा या आधी कधी बागेत जास्वंद उगवण्याचा प्रयत्न केला असेल
तर तुम्हाला पिठ्या ढेकणाचा सामना नक्कीच करावा लागला असेल. केवळ जास्वंदच नव्हे, बागेतील
बहुतेक झाडांचा व सर्व बागकाम प्रेमींचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे पिठ्या ढेकुण. वरवर पाहता निरुपद्रवी
वाटणारे हे पिठ्या ढेकुण झाडांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात. पिठ्या ढेकुण हे इंग्रजीत
मिलीबग्स या नावाने प्रचलित आहेत.
मिलीबग्सचा उपद्रव:
जास्वंदी प्रमाणेच कोरांटी, अबोली, अनंत सारख्या फुलझाडांवर मिलीबग्स येतात. त्याचप्रमाणे इंडोअर
शोभिवंत झाडं, कॅक्टस, सकुलंटस, फर्न, क्रोटोन, लिली इत्यादी झाडांवर हमखास येतात. लिंबूवर्गीय
फळझाडे, आंबा, सीताफळ, द्राक्ष, अननस अशा बागायती झाडांची अतोनात हानी करतात; तसेच वांगी,
टोमेटो अशा भाजीपाला लागवडीवर मिलीबग्स फलधारणेच्या वेळी तुटून पडतात.

सीताफळावरील मिलीबग्स |
प्रादुर्भाव असा दिसतो:
मिलीबग्स हे मावा व तुडतुड्या प्रमाणेच रस शोषून घेणारे कीटक आहेत. हे कीटक बागेतील झाडांवर
समूह करून राहतात. दुर्लक्षित झाडांवर पाहता पाहता या समूहाचे शुभ्र पांढर्या रंगाचे, लोकरीसारख्या
मेणाच्या आवरणात रुपांतर होते. या कापसा सारख्या आवरणाचा विळखा खोड, फांद्या, पाने, फुलांच्या
कळ्या, फळे, व मुळांसकट संपूर्ण झाडाला होऊ शकतो. अनुभव नसलेल्या बागकाम प्रेमींना प्रथमदर्शनी
हा एक बुरशीजन्य रोग आपल्या झाडाला झाला असावा असा भास होतो. मिलीबग्सच्या विळख्यात
अडकलेल्या झाडावर योग्य वेळी उपाययोजना न केल्यास, झाडाचा मृत्यू अटळ आहे.

फवारणी करताय? थांबा!
एखाद्या तथाकथित तज्ञाच्या सल्ल्याने जर तुम्ही रासायनिक कीडनाशकांची अंदाधुंद फवारणी करणार
असाल, तर तो एक अतिशय कामचलाऊ, तत्पुरता व घातक उपाय असेल; जिथे रोगापेक्षा इलाजच जास्त
हानिकारक ठरेल. शत्रूचा समूळ नायनाट करायचा असेल तर त्याच्या जीवनपटाचा (जीवनचक्राचा) हुशारीने
अभ्यास करायला हवा व त्या माहितीच्या आधारावर विविध स्तरांवर हल्ला चढवायला हवा. मिलीबग्सच्या
बाबतीत हा नियम निक्षून लागू होतो.

मिलीबग्सचे जीवनचक्र:
पिठ्या ढेकणाची मादी ही बिन पंखाची, जाड, लठ्ठ,अंडाकृती, सुस्तावलेली व फिकट गुलाबी रंगाची असते.
मादीच्या शरीरावर वरील नमूद केल्याप्रमाणे पांढरे पिठूळ आवरण असते. माद्या एकत्र जमून सतत झाडावरचा
रस शोषित राहतात. याउलट नरांना पंख असतात व ते उडू शकतात. उडू लागलेल्या नरांना तोंड (मुख)
नसल्यामुळे ते मात्र काही खाऊ शकत नाहीत. प्रजननाच्या क्रिये नंतर नर लगेच मरतात.
माद्या झाडावर वेगवेगळ्या ठिकाणी पिठूळ वेष्टनात शेकडो अंडी घालतात. नर असो वा नसो, पिल्ले जन्माला
घालण्यासाठी माद्यांना नरांची अवश्यकता नसते.

जाडजूड मादी |
उडणारा नर |
धावरे पिलू |
मिलीबग्सची पिले ही धावरी असतात. याच काळात त्यांचा एका झाडावरून इतर झाडांवर प्रसार होतो.
त्यांचा प्रसार करण्यात वारा, मनुष्य, मुंग्या आणि इतर प्राण्यांची मदत होते. काही दिवसातच धाव-या पिलांचे
प्रौढ माद्या किवा नारांमध्ये रुपांतर होते. मिलीबग्स आपले जीवनचक्र २३ ते ३० दिवसात पूर्ण करू शकतात.

प्रादुर्भावाचा परिणाम:
मिलीबग्स झाडांचा रस शोषून घेतातच, त्याबरोबर लाळेतून एक विषारी स्त्राव आतमध्ये सोडतात.
त्यामुळे पाने, फुले, फांद्या खुरटलेल्या व विकृतावस्थेला लागतात. वायरल इन्फेक्शन झाल्या प्रमाणे पाने
उलटी वळतात. त्यात भरीस भर म्हणून मिलीबग्स मोठ्या प्रमाणावर गोड-चिकट हनीड्यू द्रवाचा स्त्राव
करतात आणि त्यावर काजळी हा बुरशीजन्य रोग होतो. अशा जर्जर अवस्थेतील खुंटलेल्या झाडाचा
अखेरीस मृत्यू होतो.

डोंट अंडरएस्टिमेट मिलीबग्स:
मिलीबग्सच्या विध्वंस घडवून आणण्याच्या क्षमतेला कमी लेखणे ही खूप मोठी चूक ठरेल. आपण निवडुंगाचे
उदाहरण घेऊयात. साधारण सत्तर एक वर्षांपूर्वी भारतात Opuntia प्रजातीचे नागफणी निवडुंग शेताच्या
बांधावर मोठ्या प्रमाणात आढळायचे. एकेकाळी अभेद्य कुंपण करणाऱ्या या निवडुंगाचे मिलीबग्सच्या
प्रादुर्भावाने जवळ-जवळ मुळापासून उच्चाटन झाले.

निवडुंगावरील मिलीबग |
मुंबईतील मृत्यू पावलेले पर्जन्यवृक्ष |
एवढेच कशाला! काल-पर्वाचे उदाहरण घ्या. मुंबईच्या रस्त्यांची शान असलेले डेरेदार पर्जन्यवृक्ष
(Rain Trees, Samanea saman). भरपूर सावली देणाऱ्या व दिमाखात उभ्या असलेल्या या महाकाय
वृक्षांवर सात-आठ वर्षांपूर्वी मिलीबग्सनी हल्ला चढवला. नक्की काय होतंय हे समजण्याच्या आत, काही
महिन्यांतच हजारो पर्जन्यवृक्ष यमसदनी पोचले. याची साक्ष असलेले अनेक अनुभवी उद्यानविद्यातज्ञ सुद्धा
अचंबित झाले.

मुंग्या आणि मिलीबग्स:
असे हे महा-विनाशकारी पिठ्या ढेकुण मुंग्यांचे मात्र लाडके असतात. खरं तर मुंग्या मिलीबग्सना पाळीव
प्राण्या प्रमाणे वागवतात आणि वाढवतात; त्यांना स्वतः उचलून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर नेतात.
मिलीबग्स चा प्रसार करण्यामध्ये मुंग्यांचा खूप मोठा हात असतो. या संरक्षणाच्या बदल्यात मिलीबग्स
कडून मुंग्यांना गोड हनीड्यू मिळते. तेव्हा मिलीबग्सचा बंदोबस्त करण्या सोबतच त्यांचे पशुपालन करणाऱ्या
मुंग्यांचाही बंदोबस्त करायला हवा.

मुंग्या करतात मिलीबग्सची शेती |
या ब्लॉग मध्ये आपण पिठ्या ढेकुण म्हणजेच मिलीबग्सची तोंडओळख करून घेतली आणि एक कीड म्हणून
त्यांचा आवाका जाणून घेतला.शत्रूची एवढी माहिती मिळवल्यावर आता तुम्ही मिलीबग्सचा समूळ नायनाट
करण्यासाठी तयार आहात. पुढील ब्लॉग मध्ये आपण मिलीबग्सचा प्रतिबंध करण्या पासून त्यांचे योग्य आणि
नैसर्गिक (सेंद्रिय) पद्धतीने नियंत्रण करण्यापर्यंत तपशीलवार माहिती मिळवूयात. भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच पद्धतीचे माहितीपर ब्लॉग वाचण्यासाठी मला follow करा, आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा.
-हर्षद ऐनापुरे, (M.Sc. Botany, SET), संचालक: नेचर फर्स्ट हॉर्टीकल्चरस.
Email ID: harshad.naturefirst@gmail.com